कुष्ठपीडितांना मिळणाऱ्या अनुदानात दरमहा ४ हजार रुपयांची वाढ; Ram Naik यांनी फडणवीसांचे केले कौतुक

40
कुष्ठपीडितांना मिळणाऱ्या अनुदानात दरमहा ४ हजार रुपयांची वाढ; Ram Naik यांनी फडणवीसांचे केले कौतुक
कुष्ठपीडितांना मिळणाऱ्या अनुदानात दरमहा ४ हजार रुपयांची वाढ; Ram Naik यांनी फडणवीसांचे केले कौतुक

राज्यातील कुष्ठपीडितांना दरमहा मिळणारे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने रु. 2,000/- वाढवून रु. 6000/- करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व कुष्ठपीडितांसाठी दीर्घकाळ लढणारे राम नाईक (Ram Naik ) यांनी आभार मानले आहेत. काल विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांनी राज्य शासनाने कुष्ठपीडितांचे अनुदान सहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला असल्याची माहिती दिली. त्यावर सदर प्रतिक्रिया राम नाईक (Ram Naik) यांनी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा : शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार; मंत्री Sanjay Shirsat यांचे निर्देश

देशभरातल्या कुष्ठपीडितांच्या सक्षमीकरणासाठी नाईक (Ram Naik) गेली अनेक वर्षे सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने कुष्ठपीडितांना दरमहा निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय वर्ष 2008 मध्ये घेतला होता. आता हा निर्वाह भत्ता वाढविण्याची गरज असल्यामुळे त्यासाठी राम नाईक (Ram Naik) तसेच राज्यातील विविध कुष्ठ पीडित संस्था मागणी करत होत्या. गेल्याच महिन्यात कै.बाबा आमटे (Baba Amte) यांच्या ‘महारोगी सेवा समिती’च्या (Maharogi Sewa Samiti) अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये ही राम नाईक यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला होता. त्यावेळी हे अनुदान वाढविण्याचे आश्वासन तिथे उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले होते. ‘बोले तैसा चाले’ असे महायुतीचे राज्य आहे असे म्हणून प्रत्यक्षातही अनुदान वाढीचा निर्णय झाल्याबद्दल नाईक यांनी अतीव समाधान व्यक्त केले.

कुष्ठरोगामुळे येणारे अपंगत्व आणि विद्रुपता यामुळे कुष्ठपीडितांना उदर निर्वाहासाठी कोणताही व्यवसाय करणे अशक्यप्राय होते, भीक मागण्या वाचून पर्यायात उरत नाही आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवन जगता येईल एवढे अनुदान दिले गेले पाहिजे, अशी नाईक यांची मागणी होती. नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना तेथील कुष्ठपीडितांना पंतप्रधान व मुख्यमंत्री आवास योजनेच्या समन्वयाने पाणी, गॅस आदी सोयींनीयुक्त घरे बांधून देण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही योजना मंजूर झाली असून पनवेल येथे सध्या कुष्ठपीडितां साठी घरे उभारण्याचे काम सुरू आहे. राज्यभरातील सर्वच कुष्ठपीडितांना लवकरात लवकर घरे मिळतील, अशी आशाही नाईक यांनी व्यक्त केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.