
कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठात पुन्हा गोंधळ उडाला आहे. येथील विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, कॅम्पसमध्ये ईद मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली पण रामनवमी (Ram Navami) साजरी करण्याची परवानगी देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की जेव्हा येथे इफ्तार पार्टी आयोजित केली जाऊ शकते, ईद साजरी केली जाऊ शकते, मग रामनवमी साजरी करण्यात काय अडचण आहे ? (Ram Navami)
विद्यापीठाने अर्ज फेटाळला
जाधवपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रामनवमी साजरी करण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली तेव्हा हा वाद सुरू झाला. विद्यापीठ प्रशासनाने यासाठी परवानगी देण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. ३ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयानेही या विषयावर बैठक घेतली आणि विद्यार्थ्यांनी परवानगीसाठी सादर केलेला अर्ज फेटाळून लावला. (Ram Navami)
विद्यापीठाने दिले विचित्र युक्तिवाद
विद्यापीठ प्रशासनाने यामागे दोन कारणे दिली आहेत. पहिले म्हणजे, विद्यापीठाच्या परिसरात रामनवमी साजरी करण्याची परंपरा नाही. विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांना रामनवमी साजरी करण्याची परवानगी नव्हती. विद्यापीठ प्रशासनाने दिलेले दुसरे कारण म्हणजे विद्यापीठात सध्या कुलगुरू नाही. अशा परिस्थितीत नवीन परंपरा सुरू करण्याचा निर्णय घेता येत नाही. (Ram Navami)
आम्ही रामनवमी साजरी करू, विद्यार्थीही ठाम
रामनवमी उत्सवाचे विद्यार्थी आणि आयोजक सोमसूर्य बॅनर्जी म्हणाले, “या वर्षी आम्ही कॅम्पसमध्ये रामनवमी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आम्ही मागे हटणार नाही… जर लोक जाधवपूर विद्यापीठात इफ्तार साजरी करू शकतात, तर आम्ही रामनवमी का साजरी करू शकत नाही? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणावरही आम्ही कायदेशीर कारवाई करू.” (Ram Navami)
विद्यार्थ्यांना भाजपाचा पाठिंबा
विद्यापीठ प्रशासनाने अर्ज फेटाळल्यानंतरही विद्यार्थी कॅम्पसमध्ये रामनवमी साजरी करण्यावर ठाम आहेत. आता भाजपनेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे आणि राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की बंगालचे ममता बॅनर्जी सरकार जाणूनबुजून कॅम्पसमध्ये ईद आणि इफ्तार साजरी करण्याची परवानगी देते परंतु रामनवमी साजरी करण्याची परवानगी देत नाही. हा सरासर अन्याय आहे. (Ram Navami)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community