Uttamrao Jankar हे प्यादे, खरा मास्टरमाईंड रणजितसिंह मोहिते पाटीलच; भाजपा नेते राम सातपुते यांचा हल्लाबोल

71
Uttamrao Jankar हे प्यादे, खरा मास्टरमाईंड रणजितसिंह मोहिते पाटीलच; भाजपा नेते राम सातपुते यांचा हल्लाबोल
Uttamrao Jankar हे प्यादे, खरा मास्टरमाईंड रणजितसिंह मोहिते पाटीलच; भाजपा नेते राम सातपुते यांचा हल्लाबोल

ईव्हीएमच्या नावाने बोंब मारयची हा रणजितसिंह मोहित पाटलांचा डाव होता, पण तो डाव प्रशासनाने हाणून पाडला, असे विधान माळशिरचे माजी आमदार आणि भाजपा नेते राम सातपुते यांनी केला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यासाठी झालेल्या गोंधळानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी मारकडवाडी येथील मतदानाचा निर्णय स्थगित केला आहे.

( हेही वाचा : Temple : धर्मांध अमीन, यासीनने चोरली हिंदू आणि जैन मंदिरातील मूर्ती

याप्रकरणी भाजपा नेते राम सातपुते (Ram Satpute) म्हणाले की, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे मारकडवाडी ग्रामस्थांची मागणी नव्हती. हे आंदोलन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून प्रशासनाला बदनाम करण्यासाठी रचले होते. त्यामुळे उत्तम जानकर प्यादे आहेत, पण रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite-Patil) पाटील हे या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहेत, अशा शब्दात सातपुते यांनी पाटलांवर हल्लाबोल केला. (Uttamrao Jankar)

काय आहे प्रकरण?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी (Markadwadi) गावातून भाजपा उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना मताधिक्य मिळाले. मात्र हे गाव परंपरागतरित्या उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांना मानणारे आहे, असा दावा जानकरांनी केला. त्यामुळे जानकर (Uttamrao Jankar)आणि मोहिते पाटील एकत्र असल्याने या गावातून जानकर यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. असा गावकऱ्यांचा कयास आहे. मात्र भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएमबाबत शंका घेऊन मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिस प्रशासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर या मतदानाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.