उत्तर प्रदेशातील (UP) अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिराचे (Ram Mandir) मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांचे बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. रुग्णालयाने याबाबत माहिती दिली. ब्रेन हॅमरेज (Brain hemorrhage) झाल्यानंतर त्यांच्यावर लखनऊच्या (Lucknow) पीजीआयमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (Acharya Satyendra Das)
आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आचार्य सत्येंद्र दास ३ फेब्रुवारीपासून रुग्णालयात दाखल होते. ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) मध्ये दाखल झालेल्या श्री राम जन्मभूमी मंदिर-अयोध्याचे मुख्य पुजारी (Acharya Satyendra Das) यांनी पीजीआयमध्ये अखेरचा श्वास घेतला.
एसजीपीजीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, सत्येंद्र दास जी (Acharya Satyendra Das) यांना ‘ब्रेन स्ट्रोक’चा झटका आला आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि सध्या त्यांना न्यूरोलॉजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी सकाळी पीजीआयमध्ये अखेरचा श्वास घेतला. असे पीजीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. (Acharya Satyendra Das)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community