चक्क रामदास आठवलेंनी शशी थरूरांची घेतली ‘शाळा’

118

शीघ्र कवी म्हणून अवघ्या देशात प्रसिद्ध झालेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पोशाख असो वा भाषण असो गर्दीतूनही लक्ष वेधून घेतात, आज हीच किमया त्यांना सोशल मीडियात साधता आली आहे. शुक्रवारी सकाळपासून रामदास आठवले हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत, त्याला कारण म्हणजे आठवले यांनी चक्क काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या ट्विटमधील इंग्रजी शब्दांच्या चुका दाखवून दिल्या आहेत.

काय होते शशी थरुर यांचे आधीचे ट्विट?

शशी थरुर यांनी एक ट्विट केले,  त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटा होता. त्यात रामदास आठवले मागे बसलेले दिसून येतात. थरुर म्हणाले की, बजेटवरील चर्चा दोन तास चालली. रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही सांगत आहेत. याशिवाय पहिल्या रांगेत बसलेल्या लोकांना देखील अर्थमंत्री करत असलेल्या दाव्यावर विश्वास होत नाही, असे  थरुर यांनी म्हटले होते.

(हेही वाचा हिजाब तूर्तास घालू नका! उच्च न्यायालयाचा आदेश)

रामदास आठवलेंनी दाखवून दिली चूक 

थरुर यांच्या टीकेला रामदास आठवले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. डिअर शशी थरुरजी, विनाकारण वक्तव्य करताना चुका होता. Bydet नसतं तर Budget असतं आणि rely नसून reply असतं आम्ही समजू शकतो, असे रामदास आठवले म्हणाले. खरंतर शशी थरुर हे नव्या आणि मोठ्या इंग्रजी शब्दांचा वापर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. मात्र आठवले यांनी ट्विटवर त्यांना इंग्रजीचे धडे दिले.

शशी थरुर म्हणाले जेएनयूला शिकवा 

रामदास आठवले यांनी चुका पकडल्यानंतर शशी थरुर यांनी ती मान्य केली. थरुर ही टायपिंग मिस्टेक असल्याचे म्हणाले. निष्काळजीपणे टायपिंग करणे हे खराब इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे. मात्र तुम्ही शिकवत आहात तर जेएनयूमध्ये कोणीतरी आहे त्यांना तुमच्या शिकवण्याचा फायदा होईल, असे थरुर म्हणाले. शशी थरुर यांचा इशारा हा जेएनयूच्या नव्या कुलगुरु शांतीश्री धुलिपुडी यांच्याकडे होता. पंडित यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्याकरणाच्या चुका होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.