Ramdas Athawale : राहुल गांधींची भारत न्याय यात्रा ही अन्याय यात्रा आहे – रामदास आठवले

काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांना येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळणार नाही असे रामदास आठवले म्हणाले.

202
Ramdas Athawale : राहुल गांधींची भारत न्याय यात्रा ही अन्याय यात्रा आहे - रामदास आठवले
Ramdas Athawale : राहुल गांधींची भारत न्याय यात्रा ही अन्याय यात्रा आहे - रामदास आठवले

‘तय्यार है हम; लेकीन हम भी नही कुछ कम; नरेंद्र मोदीजी मे है बहोत ज्यादा दम; विरोधी पक्ष मे बैठने के लिये तयार है तुम; लेकीन सत्ता मे आयेगे नरेंद्र मोदीजी के साथ हम’ अशी काव्यमय सुरुवात करून राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही भारत तोडो यात्रा होती तशीच आता नव्याने सुरू होणारी भारत न्याय यात्रा ही अन्याय यात्रा आहे असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेसला (Congress) लगावला आहे. मुंबईत गुरुवारी (२८ डिसेंबर) सकाळी बांद्रा येथे पत्रकारांशी बोलताना नामदार रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. (Ramdas Athawale)

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा होती – रामदास आठवले

काँग्रेस (Congress) आणि सर्व विरोधी पक्षांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांना येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) यश मिळणार नाही असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. मैदानाला भारत जोडो नाव काँग्रेस देत आहे. मैदानाला नाव देऊन भारत जोडणार का असा सवाल करून गेली ७० वर्षे काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात काय केले? त्यांना ७० वर्षात भारत जोडता आला नाही का? राहुल गांधींवर (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा काढण्याची का वेळ आली? मागील ७० वर्षात जर काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळात काम केले असते तर भारत जोडो यात्रा राहुल गांधींना (Rahul Gandhi) काढण्याची गरज नसती पडली. पण राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा होती. (Ramdas Athawale)

(हेही वाचा – Hafiz Saeed : हाफिज सईदला आमच्याकडे सोपवा; पाकिस्तानकडे केली औपचारिक मागणी)

…ते आम्ही आता खपवून घेणार नाही, आठवलेंचा इशारा 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने भारत अखंड जोडला गेला आहे. तो कोणीही तोडू शकत नाही. मात्र भारत तुटला आहे त्याला जोडला पाहिजे; संविधान धोक्यात आहे. ते बदलले जाईल असे खोटे प्रचार करून काँग्रेस दलित बहुजनांनमध्ये भीतीचे वातावरण बनवून अन्याय करीत आहे. कॉंग्रेसकडे सत्ता असताना त्यांनी कधीही सामाजिक न्यायाची भूमिका घेतली नाही. गरिबांना दलितांना न्याय दिला नाही. आता भारत न्याय यात्रा काढून काँग्रेस पुन्हा अन्यायच करीत आहे. काँग्रेस ला भारत जोडायचा नाही तर तोडायचा आहे. दलित बहुजनांना काँग्रेस न्याय देऊ शकत नाही तर अन्यायच करणारी कॉंग्रेस आहे. ते आम्ही आता खपवून घेणार नाही असा इशारा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. (Ramdas Athawale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.