आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळेही महायुतीचा ऐतिहासिक महाविजय; Ramdas Athawale यांचे प्रतिपादन

43
आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळेही महायुतीचा ऐतिहासिक महाविजय; Ramdas Athawale यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणींची नारीशक्ती, सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्यासोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे देशाचा विकास; त्यामुळे दिसत आहे महायुतीच्या विजयाचा विकास; आज आम्हाला दिसत आहे निळं निळं आकाश; महाविकास आघाडी झाली आहे भकास”, अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्याबद्दल रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूळ चारली आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकवून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे असे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीचा महविजय ढोल वाजवून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी रामदास आठवले यांनीही ढोल वाजवून महायुतीचा विजय साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.

(हेही वाचा – रविवारी मध्य रेल्वेवर Mega Block; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक)

१० वर्षामध्ये १० लाख कोटी पेक्षा जास्त पैसे महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडून मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, युवा, महिला, दलित, आदिवासी आणि ओबीसी या सर्वांसाठी काम केलेले आहे. या महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भरभरुन पाठिंबा दिलेला आहे. एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून टोमणे मारण्यात आले होते आणि त्यांचा परिणाम म्हणून संजय राऊत सारखे जे नेते होते त्यांनी सातत्याने चुकीच्या पद्धतीने बोलत होते. त्यामुळे लोकांनी ठरविले की महाविकास आघाडीला धडा शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला एक मोठा धडा शिकवण्यात आला आहे. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. आम्हाला अपेक्षा होती १७० जागा मिळतील पण त्यापेक्षा जास्त ६० जागा जास्त मिळाल्या आहेत. (Ramdas Athawale)

महायुतीच सरकार एक-दोन दिवसांमध्ये स्थापन होईल. संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुसरा काही धंदा नाही आहे. त्यामुळे त्यांना फक्त आरोप करण्याचाच धंदा असल्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे. राजकारणामध्ये कसे बोलले पाहिजे. अशा पद्धतीच उलट-सुलट बोलून तुम्हाला मत पडणार नाही हे लोकांनी त्यांना दाखवून दिले आहे. संजय राऊत म्हणतात त्यांना हा निर्णय मान्य नाही. लोकशाहीमध्ये पराभव स्विकारणं हिच खरी लोकशाही आहे. संजय राऊत यांना लोकशाही मान्य नसेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मान्य नसेल तर संजय राऊत यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही. संजय राऊत चांगले माझे मित्र आहेत ते सामनाचे संपादक आहेत, अत्यंत चांगले लेखक आहेत. अशा माणसाने आता निकाल आल्यानंतरही जर त्यांना ते मान्य नाही आहे म्हटल्यावर ते अयोग्य आहे. अशा पद्धतीच्या त्यांचा व्यक्तव्यामुळेच त्यांचे मोठे नुकसान झाले आहे असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.