शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे रविवारी जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा जाहीर पक्षप्रवेशही होणार आहे. याचं पार्श्वभूमी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
नक्की काय म्हणाले रामदास कदम?
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, ‘खेड शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही असेल. ही राष्ट्रवादीची जागा होती, तिथे आम्ही भगवा फडकवलाय. पण उद्धव ठाकरेंसारखा पहिला नेता असेल, ज्यांनी आपल्याच पक्षातील आमदाराला आपणच संपवायचं आणि दुसऱ्याला भाड्यानं विकत घ्यायचं करत आहेत. हे शिवसेना प्रमुखांनी कधीच केलं नव्हतं. इथे अनिल परब यांना पाठवून आम्हाला राजकारणातून संपवण्याचा उद्योग त्यांनी केला होता. पण वरचा बसलाय, तो तारणाला आहे. हा जर आज बदल झाला नसता, तर कदाचित मला राजकारणातून संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यशस्वी झाले असते. उद्धव ठाकरेंना मलाच नाही, तर माझा मुलगा योगेश कदम यांनाही संपवायचं आहे.’
पुढे कदम म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे तुम्ही एकदा नाहीतर १०० वेळेला खेडला आले तरी रामदास कदम आणि योगेश कदम यांना काहीही फरक पडणार नाही. लोकांना, कोकणवासियांना कळलं आहे, तुम्ही आमच्यावरती कसा अन्याय केलाय.’
(हेही वाचा – संविधानाला बाजूला सारुन काँग्रेसने आतंकवाद्याप्रमाणे सरकार चालवले – चंद्रशेखर बावनकुळे)
Join Our WhatsApp Community