या सापांना जवळ करू नका; Ramdas Kadam यांचे देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

78
या सापांना जवळ करू नका; Ramdas Kadam यांचे देवेंद्र फडणवीस यांना आवाहन
या सापांना जवळ करू नका; Ramdas Kadam यांचे देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

देवेंद्र फडणवीस यांना एकच गोष्ट सांगेन की, आम्ही त्या लोकांबरोबर ५५ वर्षे काढली आहेत. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आई तुळजाभवानीची शपथ आहे. या सापांना जवळ करू नका. या लोकांना कितीही जवळ घेतले, तरी ते विष ओकल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला डसल्याशिवाय राहणार नाहीत. यांना सोबत घेऊ नका. ते तुमच्या पायावर डोके ठेवतील, काही झाले तरी त्यांना जवळ करू नका, असे आवाहन शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. गेले काही दिवस उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सातत्याने भेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास कदम (Ramdas Kadam) बोलत होते. दापोलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

(हेही वाचा – IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, नागरिक संतापले)

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा भेट घेतली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. सलग भेटींमुळे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

दिशा सालियान प्रकरणातून वाचण्यासाठी धडपड

दिशा सालियान नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती. ते प्रकरण तुम्हाला माहीत असेलच, ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढले तर यांना कठीण होऊन बसेल. या भीतीमुळे तो देवेंद्र फडणवीस यांना भेटणे सुरू आहे. केवळ आता स्वतःला वाचवण्यासाठी देवा भाऊ… देवा भाऊ… असा जप करत आहे, अशी सडकून टीका रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.