उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना राऊतांनी दिल्या होत्या अश्लील शिव्या: रामदास कदमांचा गंभीर आरोप

117

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना पत्र दिले असून यामुळे राजकारण तापले आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.

नक्की काय म्हणाले रामदास कदम?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना रामदास कदम यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी आणि स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी हे धादांत खोटे आरोप केले होते हे सिद्ध झाले आहे. संजय राऊतांना मी एवढेच सांगेन की, मी कालपर्यंत थांबलो होतो आणि गप्प बसलो होतो. कधी संजय राऊतांवर टीका केली नव्हती. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागले आहे.’

संजय राऊत मुळात शिवसैनिक नाही

पुढे कदम म्हणाले की, ‘ज्यावेळेला सामनाच्या संपादक पदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावेळेला माझ्या समोर किती अश्लील भाषेत दोघांना शिव्या घातल्या होत्या, हे कदाचित आपण विसरला असला मी विसरलो नाही. आपल्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झालेल्या आहेत. मुळात आपण शिवसैनिक नाहीयेत. हे तुम्हालाही माहितेय आणि मला माहितेय. पण आता जणू काही शिवसेना तुम्हीच वाचवताय, असा अविर्भाव आणून संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला फसवताय.’

(हेही वाचा – संजय राऊत पुन्हा अडचणीत; ठाण्यात माजी महापौरांकडून गुन्हा दाखल)

आता बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला

‘शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, बाडगा अधिक कडवा असतो, तो अधिक कडवेपणा आपण दाखवत आहात. आमदारांचे भाव तुम्हीच ठरवताय. खासदारांचे भाव तुम्हीच ठरवताय. नगरसेवकांचे भाव तुम्हीच ठरवताय. शाखाप्रमुखांचे भाव तुम्ही ठरवताय. केंद्रीय निवडणूक आयोगावरती भ्रष्टाचाराचा आरोप करताय. कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असते. एक मर्यादा असते, म्हणून मी कालपर्यंत थांबलो होतो. पण संजय राऊत आता अती झाले आहे. आणि अती झाल्यानंतर माती होते. त्यामुळे आपण थांबावे अशी माझी विनंती आहे. आता बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला, असे आम्हालाही बोलता येते. आपण कोणाचे भक्त आहात, कोणाचे काम करताय, उद्धवजींकडे कसा दिखावा करताय, हे सगळे माहितेय, बोलायला लावू नका,’ असा इशारा रामदास कदमांनी राऊतांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.