माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ६ मेला बारसू दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बारसू दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बारसूबाबत उद्धव ठाकरे सरड्यासारखे रंग बदलण्याचे काम करत आहे का?, असा सवाल कदमांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचेही म्हणाले.
नक्की काय म्हणाले रामदास कदम?
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, ‘मुख्यमंत्री असताना स्वतः उद्धव ठाकरेंनी बारसूची जागा सुचवली आहे. रिफायनरी प्रकल्प हा बारसूमध्ये करतोय, अशाप्रकारचे पत्र उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांनाही दिले आहे. मग मुख्यमंत्री असताना एक भूमिका आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर दुसरी भूमिका. म्हणजे कोकणामध्ये पाऊस आल्यानंतर सरडा जसा रंग बदलतो, तसंच सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत का? तसंच आमच्या कोकणात दुतोंडी गांडूळ असतो, त्याचप्रमाणे दुतोंडी सापासारखी उद्धव ठाकरे भूमिका बजावतात का?’
६मेच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याविषयी बोलताना कदम म्हणाले की, ‘इथे काय चौपाटी आहे का? पिकनिकला येतायत. जी गोष्टी तुम्ही सुचवली, जो प्रस्ताव तुम्ही आणला. मग त्यावेळेला तुम्ही तिथल्या जनतेशी संवाद साधून हा निर्णय का घेतला नव्हता. हा माणूस आता बारसूमध्ये लाठीचार्ज व्हावा, गोळीबार व्हावा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, एवढं करण्यासाठी इथे येतोय,’ असा आरोप केला.
(हेही वाचा – Sanjay Raut : “राष्ट्रवादीतला एक गट भाजपाच्या संपर्कात” – राऊत यांचा सामना मधून हल्लाबोल)
‘शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी’
पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या घोषणेबाबत रामदास कदम म्हणाले की, ‘शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. त्यांनी दाखवलंय, देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता माझ्यासोबत आहेत. अजितदादा तुमच्यासोबत नाहीत. अजित पवारांना त्यांनी उघडं पाडलंय. एकाकी पाडलंय. मधल्या काळात अजित पवार भाजपमध्ये जाणार जाणार चाललं होत. काही आमदारांच्या भेटीगाठी चालल्या होत्या. म्हणून या एका गोष्टीने शरद पवारांनी अजित पवारांना दाखवून दिलं की, पक्ष माझा आहे, तुझा नाही. तुझ्यासोबत कोण नाही.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community