Ramdas Kadam उद्धव ठाकरेंवर कडाडले; म्हणाले, “जनतेनेच गद्दार कोण हे…”

59
Ramdas Kadam उद्धव ठाकरेंवर कडाडले; म्हणाले,
Ramdas Kadam उद्धव ठाकरेंवर कडाडले; म्हणाले, "जनतेनेच गद्दार कोण हे..."

शिवसेनेचे शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरे वैफल्यातून वक्तव्य करत आहेत,” असा आरोप करत कदम यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरेंना लक्ष्य केले.  (Ramdas Kadam)

(हेही वाचा- Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेसह ११ जणांविरोधात विरोधात FIR दाखल ; प्रकरण काय ?)

कदम म्हणाले, “उद्धव ठाकरे लंडनला नेमके कशासाठी जातात, हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांच्याकडे असलेले उरलेसुरले आमदार आणि खासदार ते सांभाळू शकतील का, याची शंका आहे.” (Ramdas Kadam)

त्यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “जनतेनेच गद्दार कोण, हे दाखवून दिले आहे. जनतेने उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ केला असून कालच्या सभेत खुर्च्या मोकळ्या होत्या.” (Ramdas Kadam)

रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक करताना ठाकरेंवर टीका केली. “एकनाथ शिंदेंनी आपले कर्तृत्व दाखवले आहे. गाडून टाकण्याची भाषा उद्धव ठाकरेंना शोभत नाही. नियतीनेच त्यांना धडा शिकवला आहे,” असे ते म्हणाले. (Ramdas Kadam)

(हेही वाचा- Bus Ticket : एसटी, रिक्षा- टॅक्सीचा प्रवास महागणार ; १५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी)

कदम यांच्या या टीकेमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांमध्ये वाद अधिकच तीव्र झाला असून, पुढील काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. (Ramdas Kadam)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.