Ramdas Kadam on Anil Parab : माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल; रामदास कदमांचा अनिल परबांना इशारा

Ramdas Kadam on Anil Parab : 'माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल', अशा शब्दात रामदास कदमांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे.

171
Ramdas Kadam on Anil Parab : माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल; रामदास कदमांचा अनिल परबांना इशारा
Ramdas Kadam on Anil Parab : माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल; रामदास कदमांचा अनिल परबांना इशारा

उबाठा गटाचे नेते अनिल परब हे साई रिसोर्ट प्रकरणी स्वत: वादग्रस्त झाले आहेत. माझ्या मुलाला पालकमंत्री असताना संपवण्याचा प्रयत्न अनिल परब यांनी केला. हा प्रयत्नही फसला. त्यामुळे आता माझ्यावर जे आरोप केलेत. विशेषत: शिवतेज संस्थेच्या इमारती २००७ सालापासून बांधकाम झालं, २००९ पासून तिथे डेंटल कॉलेज सुरू आहे. १३-१४ वर्षांनी यांना प्रकाश पडला, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सर्व इमारती अधिकृत आहेत. एकही इमारत अनधिकृत नाही. कुठल्याही पूरनियंत्रण रेषेखाली नाहीत. रामदास कदमांना बदनाम करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन चुकीचे आरोप केलेत. त्याबाबत मुंबईत जावून वकिलांशी सल्ला घेत अनिल परब यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असे आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केले आहेत. (Ramdas Kadam on Anil Parab)

(हेही वाचा – Sanjay Nirupam : संजय राऊतांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी संपवली, आता ते काँग्रेसही संपवत आहेत; संजय निरुपम यांचा घणाघात)

बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल

खेड महापालिकेचा हरित पटेचा भूखंड रामदास कदम यांनी कायद्याचे उल्लघंन करून ताब्यात घेतला आहे. त्याठिकाणी शिवतेज संस्था बांधली आहे, या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात यावी, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली होती. त्याविषयी रामदास कदम यांनी खुलासा केला.

‘माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’, अशा शब्दात रामदास कदमांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. अनिल परब यांनी कदमांवर घोटाळ्याचे आरोप लावले होते. त्याचसोबत ही कागदपत्रे सोमय्यांना देतो, त्यांनी पाठपुरावा करून ईडी चौकशी मागणी करण्याची हिंमत दाखवावी, असे अनिल परब यांनी म्हटले होते. त्यावर रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हाताला काही लागणार नाही

रामदास कदम पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर आरोप करत असावेत. रामदास कदमांनी एकही काम अपवाद म्हणूनही चुकीचे केले नाही. कितीही पत्रकार परिषद घेतल्या, तरी त्याला गांभीर्याने घेत नाहीत. माझ्याकडे अनेक प्रकरणे आहेत. ज्या वेळी सगळी कागदपत्रे घेऊन मी उतरेन, तेव्हा पळताभुई होईल. योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन. अनिल परबांचे आरोप काय काय आहेत, ते बघून पुढचा निर्णय घेईन. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यात मोठं शैक्षणिक काम सुरू आहे. वृद्धाश्रम मोफत सुरू आहे. सैनिक स्कूल सुरू आहेत. जितकी प्रकरणे आहेत लवकर बाहेर काढा. हाताला काही लागणार नाही. कितीही प्रयत्न केले योगेश कदम हे मोठ्या मताधिकाऱ्याने दापोलीतून पुन्हा निवडून येतील. (Ramdas Kadam on Anil Parab)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.