आम्ही तोंड उघडले तर त्यांना देश सोडावा लागेल; Ramdas Kadam यांचा ठाकरेंना टोला

101
आम्ही तोंड उघडले तर त्यांना देश सोडावा लागेल; Ramdas Kadam यांचा ठाकरेंना टोला
आम्ही तोंड उघडले तर त्यांना देश सोडावा लागेल; Ramdas Kadam यांचा ठाकरेंना टोला

खोके- खोके म्हणून बाप बेटे थकले आहेत, आम्ही तोंड उघडू त्यावेळी उद्धव ठाकरे यांना परदेशात जावे लागेल. लंडन, अमेरिका, श्रीलंका या ठिकाणी कुणाचे काय आहे, हे सांगायला लावू नका, असा टोला रामदास कदम यांनी ठाकरेंना लगावला. तसेच आपल्या कारकिर्दीत दहा मुख्यमंत्री पाहिले, परंतु लोकांच्या कामासाठी पछाडलेला एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री पाहिला नाही, असे गौरवोद्गार शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काढले.

(हेही वाचा : Thane मध्ये संशयित बांगलादेशी मजुरांची पोलिसांकडून ओळख परेड)

रत्नागिरी (Ratnagiri) येथील सभेत बोलताना माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उबाठा शिवसेनेवर (Shivsena UBT ) जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जिवंत ठेवले. पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना खंजिर खुपसला. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) ठरवले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री केले. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेऊन सर्व काही गमावले आहे. म्हणून शिवसेना फुटली असा आरोपही रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

त्यामुळे आतापर्यंत खोके म्हणून बाप-बेटे थकले आहेत, आम्ही तोंड उघडू त्यावेळी मात्र यांना देशाबाहेर पळण्याची वेळ येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती विजयी झाली. आता तुम्ही उपमुख्यमंत्री झाला आहात, दोन पावले पुढे टाकताना कधीतरी चार पावले मागेही आले पाहिजे, असे सांगतानाच, कोकण हा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राचा वाघ एकनाथ शिंदे कणखर आहे. त्यामुळे कोकणातील जनता काल, आज आणि उद्याही तुमच्या पाठिशी उभा राहिल, असे ही शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले. त्याचवेळी ‘त्या’ बापबेट्यांना आयते मिळाले आहे. त्यामुळे यांनी कुणाला मोठे होऊ दिले नाही. शिवसेनाप्रमुखांनी कमावले ते यांनी गमावले, अशी टीका ही कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.