‘रमेश बैस’ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल : रायपूर मतदारसंघातून सलग सहावेळा विजय ते वाजपेयी सरकारच्या काळातील केंद्रीय मंत्री असा आहे प्रवास…

137

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून आता नव्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल असतील.

( हेही वाचा : कोरोनानंतर ‘या’ विषाणूने वाढवली चिंता! WHO ने दिला धोक्याचा इशारा)

कोण आहेत रमेश बैस?

  • रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४८ रोजी रायपूरमध्ये झाला.
  • रमेश बैस हे झारखंडचे दहावे आणि विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांनी जुलै २०१९ ते जुलै २०२१ पर्यंत त्रिपुराचे १८ वे राज्यपाल म्हणूनही काम केले. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • बैस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण, पर्यावरण आणि वन या मंत्रालयांची धुरा सांभाळली आहे. ते १९८९ आणि १९९६-२०१९ या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर सलग सहा वेळा निवडून गेले.
  • १९७८ मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. १९८० मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात रमेश बैस यांनी देशाची केंद्रीय मंत्री म्हणून अनेक खाती सांभाळली…

  • मार्च १९९८ ते ऑक्टोबर १९९९ – पोलाद आणि खाण राज्यमंत्री
  • ऑक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००० – रासायनिक खते राज्यमंत्री
  • सप्टेंबर २००० ते जानेवारी २००३ – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
  • जानेवारी २००३ ते जानेवारी २००४ – खाण मंत्रालय
  • जानेवारी २००४ ते मे २००४ – पर्यावरण आणि वन मंत्रालय

कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पदमुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ जानेवारी रोजीच्या मुंबई दौऱ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. राज्यपाल पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.