Ramesh Bais: ‘मविआ’च्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याची केली मागणी 

126
Ramesh Bais: ‘मविआ’च्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याची केली मागणी 
Ramesh Bais: ‘मविआ’च्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याची केली मागणी 

गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती पदाची निवडणूक घेतली जावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी राज्यपाल रमैश बैस यांच्याकडे करण्यात आली, यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह उबाठा गटांचे अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. 

निवेदनात काय म्हटले ? 

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयी सविनय निवेदन करण्यात येते की, विधानपरिषद हे वरीष्ठ सभागृह काही राज्यात अस्तिवात असून त्याद्वारे राज्य कारभार व विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे महामहीम राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी, विधानसभा सदस्यांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर आणि शिक्षक यांचे प्रतिनिधी यासारख्या सर्व क्षेत्रातील तज्ञांचे मिळून बनविले जाते हे आपण जाणताच.

जनतेच्या कामांचा तातडीने पुणे करण्यासाठी विधानपरिषद आणि विधानसभेची अधिवेशने घेवून मा. सभापती व मा. अध्यक्ष हे आपले प्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद हे विधानमंडळातील सर्वोच्य असून गत २ वर्ष ६ महिन्यापासून हे पद रिक्त असल्याने लोकशाही तत्य जपणारे वरीष्ठ सभागृह है विना नेतृत्व चालू असल्याची आमची भावना झालेली आहे.

(हेही वाचा – पैशांच्या वसुली प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध ACB ने केला गुन्हा दाखल)

सद्यस्थितीत 14 व्या महाराष्ट्र विधासभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. पर्यायाने विधानपरिषदेच या शासन कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असेल मा. सभापतीचे संविधानिक पद अनेक वर्ष रिक्त ठेवणे विधीमंडळाच्या प्रथा परंपरेच्या विरुध्द व लोकशाहीस पातक असल्याचे आमचे मत आहे. सभागृहाचे पक्षीय बलाबल पाहता सरकार पक्षाचे संख्याबळ अधिक असून मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद हे पद तात्विकदृष्टया सरकार पक्षाकडेच जाण्याची अधिक शक्यता आहे.

महामहीम महोदय, उक्त परिस्थिती विचारात घेता आणि विधानपरिषद सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे व पारदर्शकपणे चालवण्यासाठी या सभागृहाची निकड पाहता महाराष्ट्र विधानांरषद नियम 6 (1) नुसार मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद  (Maharashtra Legislative Council) यांची निवडणूक घेण्यासाठी याब अधिधशन कालावधीत दिनांक निश्चित करण्यात यावा, अशी विनंती विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी निवेदनात केली.

(हेही वाचा –जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाणार; Kathua Terror Attack नंतर सरकारचा इशारा )

राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसही बैस यांच्या भेटीला पोहोचले

सत्ताधारी पक्षातील भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. या भेटीत सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल रमेश बैस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

हेही  पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.