राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेत पदभार स्वीकारला

161

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना शनिवारी राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेत राज्यपाल पद स्वीकारले. या शपथविधीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश बैसे हे महाराष्ट्राचे २०वे राज्यपाल आहेत.

१९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोश्यारी यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पदमुक्त करण्यात आले आणि नव्या राज्यपालाची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

(हेही वाचा – ‘या’ मुद्द्यावरून लढा, न्याय मिळेल; प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला)

कोण आहेत रमेश बैस?

  • रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४८ रोजी रायपूरमध्ये झाला.
  • रमेश बैस हे झारखंडचे दहावे आणि विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांनी जुलै २०१९ ते जुलै २०२१ पर्यंत त्रिपुराचे १८ वे राज्यपाल म्हणूनही काम केले. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • बैस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण, पर्यावरण आणि वन या मंत्रालयांची धुरा सांभाळली आहे. ते १९८९ आणि १९९६-२०१९ या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर सलग सहा वेळा निवडून गेले.
  • १९७८ मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. १९८० मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.