Ramtek Bungalow : लकी-अनलकी असं काही नसतं; सर्व भ्रामक गोष्टींना ‘या’ मंत्र्याने दिला पूर्णविराम

219
Ramtek Bungalow : लकी-अनलकी असं काही नसतं; सर्व भ्रामक गोष्टींना 'या' मंत्र्याने दिला पूर्णविराम
Ramtek Bungalow : लकी-अनलकी असं काही नसतं; सर्व भ्रामक गोष्टींना 'या' मंत्र्याने दिला पूर्णविराम
शासकीय निवासस्थान ‘रामटेक’मध्ये वास्तव्य केले, त्याचे मंत्रिपद जाते, असा काहीसा अंधविश्वास सध्या वाढीस लागला आहे. जो कोणी मंत्री होतो, तो या ‘रामटेक’मध्ये वास्तव्यास नापसंती दर्शवत असतो. परंतु लकी-अनलकी असं काहीच नसतं, या सर्व भ्रामक गोष्टी आहेत, त्यामुळे हा बंगला मंत्री म्हणून मला देण्यात यावा अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी सामान्य प्रशासनाला केली आहे. (Ramtek Bungalow)
कसा आहे “रामटेक” बंगला ?
मलबार हिलवर असलेला रामटेक हा बंगला अत्यंत प्रशस्त आहे. या बंगल्यातून अरबी समुद्राचे मनोहारी दर्शन होते. महसूलमंत्री बावनकुळे यांना तो मिळाला होता. पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला दिला गेला. तथापि, बावनकुळे यांनी हा बंगला नाकारल्याने तो पंकजा मुंडे यांना दिला गेला आहे. या बंगल्यात त्यांचे वडील दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी हा बंगला स्वीकारला आहे. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना – भाजप युतीचे सरकार आले तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे गृहखाते आले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम रामटेकमध्ये होता. मात्र, रामटेकमध्ये राहिलेल्या मंत्र्यांच्या राजकारणाला पुढील काळात उतरती कळा लागल्याने हा बंगला अशुभ मानला जाऊ लागला. (Ramtek Bungalow)
अशा पसरत गेल्या भ्रामक गोष्टी 
सन १९९५ मध्ये युतीचे सरकार होते. त्यानंतर युतीचे सरकार जाऊन १९९९ साली काँग्रेस राष्ट्रवादी चे आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्याच काळात दुसऱ्या क्रमांकावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ याच रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते. त्यांच्यावरती स्टॅम्प पेपर घोटाळ्यामध्ये आरोप लागले. तेलगी प्रकरणात छगन भुजबळांना राजीनामा देखील द्यावा लागला होता.२०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा सरकारमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री एकनाथ खडसे हे रामटेक मुक्कामी होते. अल्पावधीतच त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला आणि तो अजूनही संपलेला नाही. (Ramtek Bungalow)
२०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या काळात देखील अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ पुन्हा या बंगल्यात वास्तव्यास आले. परंतु महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कालखंड पूर्ण करू शकले नाही त्यामुळे त्यांना पुढे जाऊन हा बंगला सोडावा लागला. नंतरच्या काळात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि या काळात शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर याच रामटेक बंगल्यात वास्तव्यास आले मात्र २०२४ ला झालेला विधानसभा निवडणुका नंतर अस्तित्वात आलेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. याच रामटेक बंगल्यामध्ये विलासराव देशमुख देखील राहत होते. त्यांनादेखील १९९५ साली लातूर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. नंतरच्या एक वर्षात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील अर्ध्या मताने त्यांचा पराभव झाला होता. (Ramtek Bungalow)
शरद पवारांसाठी मात्र रामटेक लकी 
मात्र, शरद पवार यांच्यासाठी हाच रामटेक बंगला कधी काळी ‘लकी’ ठरला होता. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी १८ जुलै १९७८ रोजी वसंतदादांचे संयुक्त सरकार पाडले आणि ‘पुलोद’चे सरकार आणले होते. त्यावेळी ‘रामटेक’ पवारांसाठी कसा लकी ठरला, याचे स्मरण होते. श्रद्धा अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी एखादी गोष्ट कोणासाठी अनलकी असेल, तर ती कोणासाठी तरी लकी देखील ठरू शकते. (Ramtek Bungalow)
असाच काहीसा भ्रम गडचिरोली पालकमंत्री पदाबद्दल देखील 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यानंतर माध्यमांमध्ये जो गडचिरोलीचा पालकमंत्री होतो, तो पुढच्या काळात राज्याचा मुख्यमंत्री होतो, अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टी पसरवण्यात आल्या. याचे कारण देखील तसेच दाखवण्यात आले आहे. २०१४ साली एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असताना त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषवले आहे. नंतरच्या काळात ते मुख्यमंत्री झाले, असा कांगावा उठवण्यात आला. मात्र या विपरीत येत्या काही काळात गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनविण्याच्या हालचाली केंद्र आणि राज्य स्तरावर सुरू आहेत. अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. ही प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी वजनदार नेत्याला पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी होती. म्हणून मुख्यमंत्री स्वतः ही जबाबदारी घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Ramtek Bungalow)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.