मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात (Ramzan Chaudhary) मविआकडुन वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) तर महायुतीकडून उज्वल निकम (Ujwal Nikam) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात दुरंगी लढत होणार, अशी चर्चा होती. मात्र लढाईत आता ‘एमआयएम’ने एन्ट्री केली आहे. याबाबत वारीस पठाण यांनी उमेदवाराविषयी माहिती दिली. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी निवडणूक होणार आहे. (Ramzan Chaudhary)
(हेही वाचा –Deepfake: निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर कराल, तर होणार कारवाई!)
एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली. वारीस पठाण म्हणाले, “महाविकास आघाडी एक तरी उमेदवार मुस्लीम देतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातूनअर्ज भरत आहोत.” (Ramzan Chaudhary)
(हेही वाचा –Ram Satpute: भाजपा उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी करणं काँग्रेस कार्यकर्त्याला भोवलं!)
ॲडव्होकेट रमजान चौधरी (Ramzan Chaudhary) हे या ठिकाणाहून अर्ज करत आहेत. रमजान चौधरी (Ramzan Chaudhary) यांना पक्षाने तिकीट दिले आहे. आता या जागेवर त्यांचा सामना काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांशी होणार आहे. (Ramzan Chaudhary)
हे पहा –
Join Our WhatsApp Community