नागपूरमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादीचे कार्येकर्ते एकाच मंदीरात हनुमान चालिसाचे वाचन करणार असल्याने, पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि राणा दाम्पत्याला परवानगी दिली आहे. परंतु त्यांना अटी शर्तीदेखील घालण्यात आल्या आहेत.
नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार
नवनीत राणा हनुमान चालिसा पठण करणार असल्याने, नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटोदेखील आहेत. त्यामुळे शनिवारी नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी कार्यलयाच्या बाहेर बॅनर लावले आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरी, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या भाजप नेत्यांचे फोटो आहेत.
( हेही वाचा: पश्चिम रेल्वे मार्गावर १४ तासांचा जम्बो ब्लॉक )
Join Our WhatsApp Community