राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; न्यायालय अजामीनपात्र अटक वाॅरंट बजावणार?

हनुमान चालिसाप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा दावा या दोघांविरोधात अजामीनपात्र वाॅरंट बजावण्याची मागणी करताना, सरकारी पक्षाने केला.

राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीचे राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करुन पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता, परंतु दोघे किंवा त्यांच्यावतीने यु्क्तीवाद करणारे वकिल न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली.

( हेही वाचा Career Choice : दहावीनंतर पुढे काय? देशातील विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखांकडे जाणून घ्या! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here