रणजित सावरकरांसमोर सावरकरविरोधक हतबल!

भारताचे पहिले व्हाईसरॉय आणि त्यांची बायको लेडी माउंटबॅटन त्यांच्या मुलीने लिहिले आहे तिचे आई-वडील आणि नेहरू यांच्यात “इट वॉज अ हॅप्पी थ्रीसम” असे संबंध होते. नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे नेहरुंनी भारताची गुप्त माहिती पुरवली, असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केला आहे. त्यांनी भारत सरकारला आवाहन केले आहे की, ’नेहरु-ऍडविना’ यांची पत्रे म्हणजे एडविना कलेक्शन ब्रिटिशांकडे मागून जाहीर करावी. तेव्हा देशाला कळेल की, ज्या नेत्याला आपण चाचा नेहरु म्हणतो, लाडका नेता म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणुक केली आणि देशाचा कसा विश्वासघात केला.

सवंग प्रसिद्धीचा राहुल गांधींचा प्रयत्न

कॉंग्रेसचे बळजबरीने बसवलेले युवराज राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुपर-फ्लॉप जात होती. काही तरुण मुली, मुलं व जमलेल्या लोकांचे हात पकडून धावल्याने कुणी पंतप्रधान होत नसतो किंवा मोठा नेता देखील होत नसतो. मुळात कोणत्याही स्वयंघोषित बुद्धिजीवी यांना भारत जोडो म्हणजे नेमकं काय हे सांगता येणार नाही. राहुल गांधींकडून तर ती अपेक्षा देखील नाही. तर ही भारत जोडो यात्रा अपशेल फेल गेल्यामुळे काहीतरी तडका दिला पाहिजे असं राहुल गांधींच्या सल्लागारांना वाटलं. म्हणून त्यांना सावरकरांच्या चरणाशी येऊन पडावं लागलं.

(हेही वाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी टोचले राहुल गांधींचे कान, म्हणाले सावरकर क्रांतिकारक, लेखक, चांगले कवी होते!)

स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतला

कारण जनतेने आपली दखल घ्यावी इतकी आपली कुवत नाही हे राहुल गांधींच्या सल्लागारांना ठाऊक आहे म्हणून त्यांनी सावरकरांवर गलिच्छ आणि खोटे आरोप केले. जेणेकरुन विस्मृतीत गेलेले बिचार्‍या राहुल यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. पण राहुल यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतला. कारण सावरकर यांच्यावर गलिच्छ टीका केल्याने ती सिद्ध करता येत नाही आणि सत्यही मानता येत नाही हे राहुल यांना माहित नाही. परंतु जर महात्मा गांधी आणि नेहरू यांच्यावर खरे पुरावे दाखवून टीका केली तर राहुल गांधी काय करणार आहेत? ब्रह्मचर्याचे प्रयोग हा काळा अध्याय जर लोकांसाठी खुला झाला तर राहुल महात्मा गांधींऐवजी स्वतःचा चेहरा ब्रॅंड ऍम्बेसडर म्हणून मिरवणार आहेत का? कारण त्यांचा चेहरा तर लोकांनी नाकारला आहे, हा असला चेहरा आम्हाला नको असं जनतेने मतांद्वारे दाखवून दिलं आहे. इतकंच काय ड्युप्लिकेट गांधी कुटुंबालाच जनतेने नाकारलं आहे. आता राहुल यांनी सावरकरांवर टीका केल्याने. सावरकर स्मारकाचे रणजित सावरकर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या सप्रमाण आरोप केले आहेत.

नेहरू देशद्रोही ठरतात

रजणित सावरकर जे म्हणत आहेत, त्याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण जर नेहरुंनी ऍडविनच्या सांगण्यावरुन देशाची फाळणी केली असेल आणि इंग्रजांना गुप्त माहिती पुरवत होते तर नेहरू हे सरळसरळ देशद्रोही ठरतात. तेच खरे ब्रिटिशांचे एजेंट ठरतात. हा सत्य इतिहास लोकांना कळलाच पाहिजे. नेहरुंच्या चेहर्‍यावरील चाचा हा बुरखा फाटला पाहिजे, जर नेहरु खरोखर अपराधी असतील तर राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका करुन खूप मोठी चूक केली आहे. कारण आता गांधी-नेहरुंचा खरा इतिहास, पुराव्यासहित बाहेर येणार आहे. राहुल गांधी हे असे दुर्दैवी युवराज आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाची सत्ता उद्ध्वस्त केली, कॉंग्रेसला देशोधडीला लावलं आणि आता ते गांधी-नेहरुंचा वारसा धोक्यात आणत आहेत. आता राहुल गांधी अशीच दुर्बुद्धी सुचावी यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. त्यांच्यामुळेच नेहरुंचा खरा इतिहास बाहेर येणार आहे आणि ब्रिटिशांचा खरा एजंट कोण आहे हे सर्वांना कळणार आहे. रणजित सावरकर यांच्यासमोर सावकर-विरोधी आणि राहुल गांधी हतबल झाले आहेत.

(हेही वाचा रिचाने नवरा केला अली, तिची बुद्धी भ्रष्ट झाली…केला भारतीय सैनिकांचा अवमान)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here