…तेव्हा नेहरुंनी शपथ घेतली होती, मी ब्रिटिश सम्राट आणि त्याच्या वंशजांशी आजन्म निष्ठा राखीन!

138

१९४६च्या मध्यंतर सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रिपदाची शपथ घेताना नेहरुंनी आपण ब्रिटिशांशी किती निष्ठावान आहोत, हे सप्रमाण दाखवून दिले होते. ‘मी ब्रिटिश सम्राट आणि त्याच्या वंशजांशी आजन्म निष्ठा राखीन’, अशी शपथ त्यांनी घेतली होती. मग नेहरुंचे वंशज आज सावरकरांवर कुठल्या तोंडाने आरोप करीत आहेत, असा सवाल स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी उपस्थित केला.

( हेही वाचा : एका बाईपायी नेहरुंनी देशाशी विश्वासघात केला; रणजित सावरकर यांचा गौप्यस्फोट)

कॉंग्रेसच्या राहुल गांधींनी १६ नोव्हेंबर रोजी वाशीम येथील जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली, असे खोटे विधान करून त्यांची बदनामी केली. या शिवाय सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार हिंदुस्थानविरुद्ध काम करीत होते, अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या या विधानांची पुराव्यांसहीत पोलखोल केली. शिवाय त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी देशाशी केलेल्या विश्वासघाताची उदाहरणेही कागदपत्रांसहीत दाखवून दिली.

सावरकर म्हणाले, भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बलवंत सिंह यांनी वल्लभभाई पटेल यांना लिहिलेले पत्र फार महत्त्वाचे आहे. ते लिहितात, पश्चिम पंजाबमध्ये कुठलीही राज्यव्यवस्था उरलेली नाही. २० हजार मुलींचे अपहरण झालेले आहे. त्या मुलींना सोडवण्यासाठी सैन्य पाठवा, अशी मागणी त्यांनी केली. पण नेहरूंनी त्या मुलींना सोडवायला सैन्य पाठवू शकत नाही, असे पत्र संरक्षणमंत्र्यांना लिहिले. याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे.

वेळोवेळी ब्रिटिशांकडे परवानगी मागितली

माऊंट बॅटननंतर स्वतंत्र भारताचा गव्हर्नर नेमण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांकडे परवानगी मागितली. किंग एडवर्ड यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, चक्रवर्ती राजगोपालाचारी (पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल) यांना गव्हर्नर म्हणून नेमण्यास सहमती द्यावी. याचा अर्थ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण गुलामगिरीतून मुक्त झालो नाही, हे नेहरू दर्शवू पाहत होते का, असा सवाल सावरकर यांनी उपस्थित केला.

दुसरे म्हणजे, मुख्यमंत्री बी. जी खेर यांना बदलून मोरारजी देसाई यांच्याकडे कारभार द्यायचा होता. त्यासाठी खेर यांना लंडनला भारताचे राजदूत म्हणून पाठविण्याची कल्पना नेहरूंना सुचली. पण, त्याआधी त्यांनी लॉर्ड माऊंट बॅटन यांना पत्र लिहून त्यासंबंधीची परवानगी मागितली.

१९५२ साली भारताच्या पंतप्रधानाला एखादी नियुक्ती करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्याला पत्र लिहून परवानगी मागायची गरज का पडली, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे. हा देशद्रोह नाहीतर काय, असा सवाल रणजित सावरकर यांनी उपस्थित केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.