मागच्या काही दिवसांपासून ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसले चर्चेत आहेत. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत स्काॅलरशीपला जाण्यासाठी अखेर रस्ता मोकळा झाला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. शिक्षणमंत्री म्हणाल्या की, माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
गुरुजींवर काय आहेत आरोप
रणजीतसिंह डिसले गुरुजी यांच्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल विभागाला प्राप्त झाला आहे. त्यांची या प्रकरणी कसून चौकशी केली जाईल, असे शिक्षणाधिका-यांनी सांगितलं. त्यामुळे डिसले गुरुजी करवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
सुट्टीही मंजूर केली जात नव्हती
त्यातच डिसले गुरुजींनी अमेरिकेत स्काॅलरशिपला जाण्यासाठी केलेला सूट्टीचा अर्जही मान्य केला जात नव्हता, त्यामुळे फुलब्राईट स्काॅलरशीप हातातून जाण्याची भीती डिसले गुरुजींना सतावत होती. पण, आता मात्र वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन, गुरुजींना स्काॅलरशिपला जाण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
( हेही वाचा: गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ! शेलारांचा राऊतांवर निशाणा )
भाजपाने घेतला आक्षेप
ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी PHD करण्यासाठी अमेरिकेला जायला रजा मागितली. पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांना रजा नाकारणे, त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेणे निंदनीय आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजींना असा अनुभव येणे चुकीचे असून अशा शिक्षणधिकाऱ्याचा निषेध आहे, असं भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले.
कोण आहेत रणजितसिंह डिसले?
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले
- QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम
- कार्याची दखल घेत त्यांना 4 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- जून 2021 मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली
- शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठाकडून 20 नोव्हेंबर 2021 रोजी मानद डॉक्टरेट प्रदान
- 1 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- याच स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे.