फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालकपदी बढती

160

फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली आहे. रश्मी शुल्का, अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : Ind vs Aus : भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या परावभानंतर ऑस्ट्रेलिया घेणार महत्त्वाचा निर्णय )

रश्मी शुक्लांवर आरोप

शनिवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. रश्मी शुक्लांवर आरोप
१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची चौकशी सुरू असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव दलाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.

पोलीस महासंचालकपदी एसीसीकडून बढती

दरम्यान आता रश्मी शुक्ला यांना एसीसीकडून पोलीस महासंचालकपदी एसीसीकडून बढती मंजूर करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.