रश्मी शुक्लांविरोधातील गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात!

164

 पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयात एका बड्या राजकीय व्यक्तीला बोलविण्यात आले होते. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा त्यांचाच आहे का याची खातरजमा करण्यासाठी या व्यक्तीला बोलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

६० दिवस फोन टॅपिंग

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने ६० दिवस फोन टॅपिंग केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला होता. राज्य शासनाच्या अहवालानुसार पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबईत दाखल एफआयआर प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या प्रकरणी 1 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. मात्र रश्मी शुक्ला यांच्या या याचिकेला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आला.

(हेही वाचा फडणवीसांना पोलिसांची नोटीस, कोणती आहेत कलमे, किती शिक्षा होऊ शकते?)

1 एप्रिलपर्यंत संरक्षण

याचप्रकरणी पुण्यात दाखल पहिल्या केसमध्ये रश्मी शुक्ला सहकार्य करत नसल्याचा राज्य सरकारने उच्च न्यायलयात आरोप केला. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत येत्या 16 आणि 23 मार्च रोजी मुंबईत तपास अधिका-यांपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांचा गुन्हा रद्द करण्यासाठीच्या दोन्ही याचिकांवर 1 एप्रिलला एकत्रित सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने शुक्रवारी जारी केले. फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.