मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांची २३ मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते, मात्र आता त्यांची तब्येत खालावली असून त्यांना दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाकरे कुटुंबात चिंतेचे वातावरण!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे चिंतेत होते. 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी ट्विट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आणि आता रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ठाकरे कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
(हेही वाचा : ठरले! अखेर ‘हे’ करणार परमवीर सिंगांच्या आरोपांची चौकशी! )
मुख्यमंत्र्यांच्या घरात कोरोनाची घुसखोरी!
दरम्यान यापूर्वी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे.
Join Our WhatsApp Community