राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने BJP ची खरडपट्टी का काढली ?

81
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने BJP ची खरडपट्टी का काढली ?
  • प्रतिनिधी

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांना घेऊन सर्वच पक्षांमध्ये बैठकांचा जोर वाढला आहे. विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपा सोबतच मुद्द्यांवर देखील चर्चा होत आहे. निवडून येण्यासाठी मतदारसंघ निहाय स्थानिक मुद्द्यांना देखील प्राधान्य देण्याची चर्चा होत असताना दक्षिण मुंबई मधील काही मतदारसंघातील धार्मिक समीकरणे पाहता इतर धर्मियांनसंदर्भात केले जाणारे लांगुलचलन पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाचे (BJP) चांगलेच कान टोचले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

(हेही वाचा – CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत पुढे ढकलली; काय आहे कारण ?)

हिंदुत्त्ववादी मुद्द्यांना बगल दिल्याने नाराजी

विधानसभा मतदारसंघात धार्मिक समीकरणे काहीही असो परंतु आपल्या मूळ मुद्द्याला म्हणजेच हिंदुत्वाच्या मुद्द्यांना बगल देता कामा नये. आपला मूळ हार्डकोर मतदार हा हिंदुत्ववादी विचारधारीचाच असल्याने इतर धर्मीयांचे लांगुलचालन केलेले मूळ मतदाराला पटणार नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल देऊन काम करणे संघाला आवडलेले नसण्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हिंदूत्ववादी मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा सल्ला देखील देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. (BJP)

(हेही वाचा – Bombay High Court ने सांगितले बेकायदा झोपडपट्ट्या नियमित होण्यामागील राजकारण)

रविवारी गिरगाव येथे झालेल्या बैठकीत संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी दक्षिण मुंबईतील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच इतर धर्मियांचे लांगुलचालन करू नका अशी समज देखील देण्यात आली आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.