उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या रसुलाबाद घाटाचे नाव बदलण्यात आले आहे. हा घाट आता चंद्रशेखर आझाद घाट, या नावाने ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून प्रयागराज महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा महाराष्ट्रातील EVM विरोधी आंदोलन असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ निघाला दिल्लीचा)
नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार याबाबतचा औपचारिक आदेश आठवडाभरात जारी करून तेथे नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार आहे. रसुलाबाद घाट गंगा नदीच्या काठावर आहे. या घाटावर दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद चंद्रशेखर आझाद यांच्यावरही याच घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळेच या घाटाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. प्रयागराज महानगरपालिकेने घाटाला नवीन नाव देण्याची सुरुवात 1991 मध्येच हाती घेतली होती. 1991 मध्ये महापालिका सभागृहाने नामकरणाचा ठराव केला होता. मात्र, 33 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप कोणताही औपचारिक आदेश काढण्यात आलेला नव्हता. (Uttar Pradesh)
Join Our WhatsApp Community