Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा, मुख्यमंत्र्यांची माहिती

143
Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा, मुख्यमंत्र्यांची माहिती
Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा, मुख्यमंत्र्यांची माहिती

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

(हेही वाचा-Ratan Tata Death : “एक दूरदर्शी, दयाळू, विलक्षण व्यक्तिमत्व”, रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक)

पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर (Ratan Tata Death) त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

(हेही वाचा-Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (Ratan Tata Death)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.