टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. ८६ वर्षीय रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी (१० ऑक्टोबर) दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारत सरकारच्या वतीने गृहमंत्री अमित शाह त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. (Ratan Tata Death)
रतन टाटा यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर उद्योग, राजकारण आणि चित्रपट जगतातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना एक दूरदर्शी व्यापारी नेते आणि एक असाधारण माणूस म्हणून संबोधले आहे. (Ratan Tata Death)
रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रातून गृहमंत्री अमित शाह हे येणार असल्याचे वृत्त येत आहे. भारत सरकारकडून शाह हे रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करतील असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आशियाई-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लाओस दौऱ्यावर (Laos tours) निघाले आहेत. यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीत. मोदी यांनी रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांचे फोनवरून सांत्वन केले आहे.
(हेही वाचा – Women’s T20 World Cup : श्रीलंकन महिलांचा ८२ धावांनी पराभव करत भारताने राखलं टी-२० विश्वचषकातील आव्हान )
पंतप्रधान मोदी
पीएम मोदी (PM Narendra Modi) ‘एक्स’ वर म्हणाले, ‘रतन टाटाजींचा सर्वात अनोखा पैलू म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि इतरांना परत देण्याची त्यांची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण या विषयांचा प्रचार करण्यात ते आघाडीवर होते. रतन टाटा यांनी टाटा समूहाला (Tata Group) स्थिर नेतृत्व प्रदान केले, भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यवसाय घराण्यांपैकी एक, त्यांच्या नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजात सुधारणा करण्यासाठी अटल वचनबद्धतेमुळे ते अनेकांचे प्रिय होते. तसेच आम्ही विविध विषयांवर विचार विनिमय करायचो. मला त्याचा दृष्टीकोन खूप अर्थपूर्ण वाटला. दिल्लीत आल्यानंतरही हा संवाद सुरूच होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून श्रद्धाजंली वाहिली. (Ratan Tata Death)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community