प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार
पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर (Ratan Tata Death) त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (Ratan Tata Death)
कुठे ठेवलं जाणार पार्थिव?
मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अत्यंदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. दुपारी 3.30 वा. रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. गेट ३ वरुन एनसीपीए लॅानमध्ये प्रवेश करावा. श्रद्धांजली वाहिल्यानंतर गेट नंबर 2 मधून बाहेर पडावे. एनसीपीएच्या आवारात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसणार आहे.” अशा सुचना करण्यात आल्या आहेत. (Ratan Tata Death)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community