केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकार (Central Govt) सर्व रेशन कार्डधारकांना (Ration Card) मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.
(हेही वाचा –‘Emergency’ चित्रपटावर बंदी येणार? सेन्सॉर बोर्डाच्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या, कंगना म्हणाली…)
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे. (Ration Card)
(हेही वाचा –Assam सरकारचा मोठा निर्णय! नमाज पठणासाठी मिळणारी २ तासांची सुट्टी आता बंद)
नव्या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होईल, तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होईल. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, जे लोक अद्याप या योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून शिधापत्रिका मिळवावी आणि या सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. (Ration Card)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community