लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha) मतदान पार पडले आहे. आता लक्ष लागले आहे ते तिसऱ्या टप्प्याकडे. येत्या ७ मे रोजी मतदानाचा हा तिसरा टप्पा पार पडणार असून यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha) भावी खासदाराचेही भवितव्य ठरणार आहे. यादरम्यान २९ एप्रिल रोजी रत्नागिरीत मनसे (MNS) आणि उबाठा गट (UBT Group) यांची एकाच वेळी सभा होणार आहे. (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha)
सभेच्या रुपात आता मनसे- उबाठा गट आमनेसामने
उद्धव ठाकरे हे २९ एप्रिल रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते रत्नागिरीत (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha) आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधित करणार आहेत. दुसरीकडे याच वेळी मनसेनेदेखील आपली सभा आयोजित केली आहे. सभेच्या रुपात आता मनसे- उबाठा गट आमनेसामने आले आहेत. रत्नागिरी शहरात संध्याकाळी ६ वाजता मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दोन वेगवेगळ्या सभा होणार आहेत. (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha)
रत्नागिरीत काय होणार ?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवत आहेत. ते महायुतीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे विनायक राऊत (Vinayak Raut) हे मविआचे उमेदवार आहेत. राऊत यांच्याच प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रत्नागिरीत जात आहेत. ठाकरेंच्या सभेवेळीच दुसरीकडे मनसेचीही सभा होत आहे. त्यामुळे आता २९ एप्रिल रोजी रत्नागिरीत काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community