Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : नारायण राणे यांचा लघु, सुक्ष्म पण मोठा विजय

204
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : नारायण राणे यांचा लघु, सुक्ष्म पण मोठा विजय
  • सचिन धानजी,मुंबई

कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा हट्ट असतानाही या मतदार संघातून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राणेंचा पराभव होणार अशाप्रकारचा प्रचार विरोधकांसह काही कोकणातील जनतेने केला होता. त्यातच रत्नागिरीत किरण सामंत यांची नाराजी आणि मतदानांच्या दिवशी असलेली नाराजी यामुळे राणेंच्या पराभवाची समिकरणे रंगवली जावू लागली. परंतु आपण ३ लाख मतांनी विजयी होणार अशाप्रकारचा विश्वास स्वत: राणे यांनी व्यक्त केलेला असतानाच तब्बल ५० हजार मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करत त्यांची विजयाची हॅटट्रिक रोखली. त्यामुळे राणे यांचा विजय हा लघु, सुक्ष्म असला तरी भाजपाच्या दृष्टीकोनातून मोठा विजय मानला जात असून एकप्रकारे कोकणातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद संपुष्टात आणली आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

या मतदार संघावर पहिल्यापासून शिवसेनेने दावेदारी सांगितली होती, परंतु शेवटच्या क्षणाला भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे या मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याने मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नाराज झाले होते. आजवर केवळ शिवसेना आणि काँग्रेस तिकीटावर उभे राहणारे नारायण राणे हे प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. भाजपाचे उमेदवार असल्याने तसेच कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने राणे यांच्यासाठी आता पुरक वातावरण आहे. राणे यांची हक्काची सुमारे अडीच हजार मते होती. परंतु शेवटच्या फेरीपर्यंत राणे यांना ४ लाख ४३ हजार ११८ मते आणि विनायक राऊत यांना ३ लाख ९३ हजार ९४४ मते मिळाली. त्यामुळे तब्बल ४९ हजार १७४ मतांनी अखेर राणे यांचा विजय झाला. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यांनतर राऊत हे कधी आघाडीवर होते, तर कधी राणे आघाडीवर राहिले, परंतु १४ फेरीनंतर राणे यांनी प्रत्येक फेरीतील आघाडी कायम राखली. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत राणे यांना विजय सुकर झाला. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result : पुन्हा एकदा हिंदूंनीच केला हिंदूंचा घात !)

राऊत हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राऊत यांना सन २०१४मध्ये ४ लाख ९३ हजार ०८८ मतदान झाले होते, तर सन २०१९मध्ये विनायक राऊत यांना ४ लाख ५८ हजार ०२२ मतदान झाले होते. त्यातुलनेत राऊत यांना यावेळेस ३ लाख ९६ हजार ५२४ मतदान झाले. त्यामुळे राऊत यांचे मतदान घटल्याचे यावेळेस दिसून येत आहे. त्यातुलनेत सन २०१४मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या निलेश राणे यांना ३ लाख ४३ हजार ०३७ मतदान झाले होते, तर सन २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे निलेश राणे यांना २ लाख ७९ हजार ७०० मतदान झाले होते. त्यातुलनेत प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणे (Narayan Rane) यांना ४ लाख ४५ हजार ३३९ एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे स्वत:च्या परंपरागत अडीच लाख मतांच्या तुलनेत राणे यांना दोन लाख मते अधिक मिळाली असून ही वाढीव मतांमध्ये मनसेचा मतांचा मोठा हातभार असल्याचे दिसून आले आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

राणे यांना कुडाळ मालवण, कणकवली आणि सावंतवाडी या मतदार संघात जास्त मते मिळाली आहेत. तसेच रत्नागिरी मतदार संघातूनही अधिक मतदान झाले असून राजापूर आणि चिपळून मतदार संघातून सर्वांत कमी मतदान झाले आहे. त्यामुळे राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपली ताकद मोठ्याप्रमाणात लावली आणि याचा परिणाम राणे यांचा विजयात परावर्तीत झालेला दिसून आला आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार विनायक राऊत यांना १५,७६९ आणि नोटा ११,५१५ या मतांची बेरीज केली तरी यांची एकण संख्या २६ हजारांवर जात असून वंचितचे मारुती जोशी यांनी ९८७३ मते आणि इतर छोटे पक्ष आणि अपक्षांनी सरासरी पाच ते सहा हजार मते मिळवल्याने उबाठाचे विनायक राऊत यांची विजयाची हॅटट्रिक हुकली गेली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे दिसून येत आहे. नारायण राणे हे केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम खात्याचे मंत्री असले तरी त्यांचा विजय हा त्यांचा खात्याप्रमाणेच ठरला आहे. राणे यांचा विजय हा लघु, सुक्ष्म असला तरी पक्षासाठी मोठा असल्याचे दिसून येत आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

उमेदवारांना झालेले एकूण मतदान
  • नारायण राणे, भाजपा (एकूण मतदान ४, ४५, ३३९)
  • विनायक राऊत, उबाठा शिवसेना (एकूण मतदान ३,९६,५२४)
  • विनायक राऊत, अपक्ष उमेदवार (एकूण मतदान १५,७६९)
  • नोटा : एकूण मतदान ११, ५१६ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.