समीर वानखेडेंच्या बारवरील कारवाईमागे राऊत-मलिक! मोहीत कंबोज यांचा आरोप 

92

महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज सलीम – जावेद जोडीची जुगलबंदी सुरू आहे. यात सलीम म्हणजे नवाब मलिक, तर जावेद म्हणजे संजय राऊत. विषय फक्त कोणाच्या बारचा परवाना रद्द करण्याचा नाही, तर सत्तेत असताना सत्तेचा आणि अधिकार्यांच्या दुरूपयोग करण्याचा आहे. २४ वर्षांनंतर समीर वानखेडेच्या बारचा परवाना रद्द केला गेला, यामध्ये खरच वानखेडेंचा परवाना चुकीचा होता का, हे येणारी वेळ ठरवेल, असे  भाजपाचे नेते मोहीत कंबोज म्हणाले.

वैयक्तिक दुश्मनीसाठी सत्तेचा दुरुपयोग 

ज्यांनी हा परवाना रद्द केला ते अधिकारी ठाणे कलेक्टर हे संजय राऊत यांचे व्याही ( संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे) आहेत. एकीकडे नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने असल्याप्रकरणी अनेकदा फटकारले आहे. राज्यात सलीम – जावेदची ही जोडी आपापले पर्सनल स्कोर सेटल करण्यातच लागले आहेत, असे भाजपाचे नेते मोहीत कंबोज म्हणाले. महाराष्ट्रात आता वैयक्तिक दुश्मनीमध्ये बदला घेण्यासाठी सत्ता आणि अधिकारांचा वापर केला जातोय का?, अधिकार्यांसोबत असणाऱ्या नात्याचा फायदा स्वत:चे वैयक्तीक स्कोर सेटल करण्यासाठी वापरण्यात येतो का?, हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. माझा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेलाच आहे की, जे सरकार चोरी करून सत्तेत बसले आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार चालवत आहे हे योग्य आहे का? आता जनतेने याचे उत्तर द्यावे, अशा प्रकारे भाजपचे युवा नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर खोचक टिका केली.

(हेही वाचा बंडातात्या कराडकरांची पोलिसांकडून चौकशी! आता पुढे काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.