आम्ही जेलमध्ये असताना, आमच्या मुंबईच्या फ्लॅटवर मुंबई महानगरपालिकेची नोटीस आली. 2007 मध्ये बांधल्या गेलेल्या इमारतीत आमचा एकच फ्लॅट आहे. 15 वर्षांनंतर आम्हाला नोटीस येत आहे, तर हे काम फक्त मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन होत आहे. त्यामुळे महानगरपालिका जी भ्रष्टाचाराची लंका आहे. त्यात चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही काम करणार असल्याचे, रवी राणा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे आभार
ज्या पद्धतीने हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे कठोर कारवाई करत, इंग्रजांच्या काळातले राजद्रोहाचे कलम लावले जाते. टिळकांपासून ते सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यावर हे देशद्रोहाचे कलम लावण्यात येत होते आणि त्याच कठोर कायद्याचा वापर मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. 14 दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवण्यात आले. मोदी सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार व्यक्त करतो आणि निर्णयाचा सन्मान करतो की या कायद्याला स्थगिती दिली.
मोदींचा फोटो लावून मतं मागितली
एका महिला खासदाराला आणि आमदाराला जेलमध्ये टाकून मुख्यमंत्र्यांनी मर्दांनगीचे नव्हे, तर नामर्दाचे काम केले आहे. बाळासाहेब जर वरुन पाहात असतील, तर त्यांनाही दु:ख होत असेल. कोणाच्या हातात कारभार गेला, असे बाळासाहेबांना वाटत असेल. मोदींचा फोटो लावून मतं मागितली आणि नंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका रवी राणांनी केली आहे.
( हेही वाचा: शिवसेनेने चोरली राज ठाकरेंच्या सभेची गर्दी )
…म्हणून प्राचीन मंदिरात करणार महाआरती
14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेवरही रवी राणा यांनी भाष्य केले आहे. रवी राणा म्हणाले की, 14 तारीखला मुख्यमंत्र्यांनी जी सभा ठेवली आहे, त्या सभेदरम्यान, सर्वसामान्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही दिल्लीतील प्राचीन मंदिरात महाआरती करणार असल्याचे, रवी राणा यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community