राणा दाम्पत्याना कारागृहात नियमानुसार वागणूक! मंत्री अनिल परबांची भूमिका  

95
कारागृह त्यांच्या नियमानुसार चालत असते, त्यामुळे राणा दाम्पत्याची तक्रार काही उपयोगाची नाही, जर नियमांचे उल्लंघन झाले असते तर त्याचा विचार करावा लागला असता, असे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी रवी राणा यांनी त्यांच्या गाडीत, घरी, कार्यालयात  हनुमान चालीसा वाचल्याने कुणाला त्यात आक्षेप असण्याची आवश्यकता वाटत नाही, त्यांनी खुशाल हनुमान चालीसा वाचावी असेही ते म्हणाले.

१२ आमदारप्रकरणी निरीक्षणांचे काय? 

किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्य यांना जामीन देताना सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे, विविध प्रकरणात न्यायालयात निरीक्षण नोंदवत असते. सरकार त्या निरीक्षणाचा विचार करेल. न्यायालयाचे निरीक्षण आणि न्यायालयाचा आदेश वेगळा असतो. न्यायालयाने १२ आमदारांच्या प्रकरणीही निरीक्षण नोंदवले आहे. त्याचीही संबंधित यंत्रणा दखल घेत नाही, याचाही विचार झाला पाहिजे, असेही मंत्री परब म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.