आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मातोश्री येथे देण्यास कडाडून विरोध करत शिवसैनिकांनी मातोश्री येथे आणि राणा दाम्पत्यांचे खार येथील घरासमोर ठिय्या आंदोलन केले. शुक्रवार, २२ एप्रिलपासून ही आंदोलन सुरु होते, मात्र तरीही दुपारी राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आम्ही शनिवारी, २३ एप्रिल रोजी हनुमान चालीसा म्हणणारच असा निश्चय केला. ही पत्रकार परिषद होऊन २ तास उलटत नाही तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे हे मातोश्री येथे दाखल झाले. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून थेट मातोश्री येथे येण्यामागे काय कारण आहे, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
सेनेच्या क्षमतेवर प्रशचिन्ह
एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवाच्या दिवशी जाहीर सभेत ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा त्याच्या पुढे दुप्पट भोंगे लावून हनुमान चालीसा लावा, असे आवाहन केले. तेव्हापासून राज ठाकरे यांनी अवघ्या देशात हलकल्लोळ माजवला आहे. आता त्यापाठोपाठ आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सक्रिय झाले आहेत. त्यांनी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा बोलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अवघी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. राणा दाम्पत्याने अवघ्या शिवसेनेला रस्त्यावर आणून ठेवल्यामुळे सेनेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान राणा दाम्पत्याने वर्षा बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला आव्हान दिले. त्यानंतर दोन तासांतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरून थेट मातोश्री येथे दाखल झाले आहेत. त्यावेळी मातोश्री येथे सकाळपासून जमलेल्या शिवसैनिकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मुख्यमंत्री मातोश्रीत का दाखल झाले, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
(हेही वाचा जुन्या मशिदीच्या खाली आढळले हिंदू मंदिर!)
Join Our WhatsApp Community