स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संघटनेच्या या निर्णयानंतर रविकांत तुपकर यांनी एक ट्वीट केलं. सध्या हे ट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेता विषय ठरत आहे.
(हेही वाचा – Raigad Monsoon Update: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! तिघांचे बळी तर ८ जनावरे दगावली)
रविकांत तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नाही, असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्त पालन समितीची बैठक सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
माहिती आहे मला पुढची तुझी खेळी
“संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो…”, असं ट्वीट रविकांत तुपकर यांनी केलं आहे. त्याखाली त्यांनी त्यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची विझलो जरी आज मी… या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत.
संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो,
पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो….माहिती आहे मला पुढची तुझी खेळी,
मी तुला आतून बाहेरून ओळखतो… pic.twitter.com/1qksMvwNPu— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) July 22, 2024
काय म्हणाले जालिंदर पाटील ?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले की, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तुपकर यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद दिलं. संघटनेच्या वतीनं राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद दिले. तरीही तुपकर संघटनेच्या विरोधात काम करत राहिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुपकर यांनी 26 सप्टेंबर 2019 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांच्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सक्रिय होते.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community