
वक्फ सुधारणा विधेयकावरुन (Waqf Amendment Bill) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली. वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) दि. २ एप्रिलला संसदेत मांडले जात आहे. त्यात उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांना वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा (Hindutva) काडीमात्र संबध नाही, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली. (Chitra Wagh) त्याविरोधात आता भाजपा आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चित्रा वाघ यांच्यानंतर आता भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. (Ravindra Chavan )
( हेही वाचा : ‘मराठी येत नसेल तर…; Ambernath मध्ये मनसे कार्यकर्त्यांचा बँक मॅनेजरला इशारा)
संजय राऊत आपण ‘हिरवी कावीळ’ झालेल्या ज्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता, त्यातून तुम्हाला वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, असं वाटणं साहजिकच आहे. पण वक्फ बोर्डाची हिंदूंच्या (Hindu) विरोधातील मनमानी खरंच जाणून घ्यायची इच्छा असेल, तर देशभरातील हिंदू मंदिरं आणि ज्या सर्वसामान्य हिंदूंची (Hindu) घरे वक्फ बोर्डाने (Waqf Board) बळकावली आहेत, त्यांना विचारा. ते ‘वक्फग्रस्त’ हिंदू ज्या शोकांतिका सांगतील, त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा ! बाकी काँग्रेसच्या पाठिंब्यावरचं बांडगुळ झालाय तुमचा पक्ष… तेव्हा ‘मालकीणबाईं’च्या सासूबाईंचं कोडकौतुक सुरू राहू देत !, अशी टीका भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी राऊतांवर केली आहे.
राऊतांनी काय ट्विट केले!
वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill) पाठिंबा आहे की विरोध? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “आमची ठरलेली भूमिका तुम्हाला शेवटच्या क्षणी दिसेल. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावर करायच्या असतात, त्या आम्ही करु. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा (Hindutva) काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला ।’”, असा इशारा राऊतांनी दिला होता. (Chitra Wagh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community