Ravindra Chavan: दिल्ली भेटीवर रविंद्र चव्हाणांनी ट्विट करत दिली महत्त्वाची माहिती

226
Ravindra Chavan: दिल्ली भेटीवर रविंद्र चव्हाणांनी ट्विट करत दिली महत्त्वाची माहिती
Ravindra Chavan: दिल्ली भेटीवर रविंद्र चव्हाणांनी ट्विट करत दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना दिल्लीत (Amit Shah) बोलावून घेतलं होतं. पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत पोहोचले होते. यामुळे अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. यावर चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा- Chhattisgarh: तेलंगणा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! छत्तीसगड सिमेवर 7 माओवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी एक पोस्ट शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती.” असे रविंद्र चव्हाण म्हणाले. (Ravindra Chavan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.