Ravindra Chavan : शिवसेना उबाठा गटाच्या सामना (Saamana) मुखपत्रात “फुले विरुद्ध फडणवीस” (Phule vs Fadnavis) या शिर्षकाने लिहीण्यात आलेल्या अग्रलेखाला भाजपाचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सामनाचे संपादक असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव ‘तेढकर’ (Tedhkar) असे हवे होते असा टोला चव्हाणांनी लगावला आहे. (Ravindra Chavan)
समाजा समाजात तेढ निर्माण करून ‘सामन्याची’ मजा घेणाऱ्या संपादकाने “फुले विरुद्ध फडणवीस” हा अग्रलेख समाज प्रबोधनासाठी नव्हे तर समाज विघटनासाठी लिहिलाय.
त्यांचं नाव खरंतर संजय तेढकर असायला हवं…
आपल्या लेखणीतून… वक्तव्यातून…. कृतीतुन…. सतत समाजा – समाजात तेढ निर्माण करणं…— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) April 14, 2025
संजय राऊतांनी लिहीलेल्या अग्रलेखावर (Samana Article) ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेत रवींद्र चव्हाण म्हणाले की, “समाजा-समाजात तेढ निर्माण करून ‘सामन्याची’ मजा घेणाऱ्या संपादकाने फुले विरुद्ध फडणवीस हा अग्रलेख समाज प्रबोधनासाठी नव्हे तर समाज विघटनासाठी लिहिला आहे. त्यांचे नाव खरंतर संजय तेढकर (Sanjay Tedhkar) असायला हवे. आपल्या लेखणीतून, वक्तव्यातून आणि कृतीतुन सतत समाजात तेढ निर्माण करणे एवढेच काम या संपादक महाशयांनी केले आहे आणि तेवढेच त्यांना येते,” असा टोला चव्हाण यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) हे महाराष्ट्राचे नेते आहेत. अंत्योदय आणि मानवतेची विचारधारा रुजविणाऱ्या शामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांना आदर्श मानणारे नेते आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राची जनता जाणते. त्यामुळे अहो तेढकर, सावित्रीमाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर “मानवाचे नाते, ओळखती जे ते, सावित्री वदते ते संत.” सावित्रीमाईंचे काव्यफुले मधलेच हे शब्द आहेत आणि तीच आमची विचारधारा असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community