Ravindra Dhangekar यांच्या अडचणीत वाढ! कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता

723
Ravindra Dhangekar यांच्या अडचणीत वाढ! कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता
Ravindra Dhangekar यांच्या अडचणीत वाढ! कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता

पुणे अपघात प्रकरणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) जाब विचारत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे पुणे उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर रेटकार्ड वाचून दाखवलं आणि त्यासंदर्भात उत्तर द्या, काय कारवाई करणार आताच सांगा, असं विचारत धारेवरही धरलं होतं. त्यासोबतच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधातही बेताल वक्तव्य केल्याचा आरोप शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) कार्यालयाकडून केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा –Jagannath Chandan Yatra: पुरीमध्ये भगवान जगन्नाथ चंदन यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; १५ भाविक होरपळले!)

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना याप्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. पुणे कार अपघात प्रकरणी धंगेकर यांनी आरोप केले होते. याच आरोपांवरून आता धंगेकरांना करावा लागणार कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो. (Ravindra Dhangekar)

(हेही वाचा –Bhavesh Bhinde : भिंडेच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, भिंडेचे मासिक उत्पन्न कोटींच्या घरात)

पुणे अपघात प्रकरणानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) चर्चेत आहेत. धंगेकरांनी एकापाठोपाठ एक अशा आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ट्विटरवरुनही त्यांनी काही ट्वीट करत पुण्यात सुरू असलेले गैरप्रकार समोर आणले आहेत. अशातच आता पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी केलेले काही आरोप त्यांना भोवणार असं चित्र दिसतंय. या प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) पुणे उत्पादन शुल्क विभागावर आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर अनेक गंभीर आरोप केले होते. याचप्रकरणी आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. मंत्री शंभूराज देसाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धंगेकरांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. (Ravindra Dhangekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.