पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना घोषित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत ही उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी घोषित केल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे यावरुन स्पष्ट झाले आहे.
ट्वीटमध्ये काय लिहिले आहे?
पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काॅंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून, येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.
( हेही वाचा: ‘जे राजकारण झालं, त्यामुळे मी व्यथित’; सत्यजित तांबे प्रकरणावर थोरातांची पहिली प्रतिक्रिया )
पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 6, 2023
धंगेकर केसरीवाड्यात
धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी रोहित टिळकही उपस्थित होते. यावेळी धंगेकर यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घातला. मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर होत्या. मी नगरसेवक असताना, त्यांच्यासोबत काम केले आहे. प्रत्येक निवडणुकीत केसरीवाड्यात येऊन मी टिळकांचे दर्शन घेत असतो. त्याप्रमाणे आजही आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community