Ravindra Dhangekar : पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन भोवले; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

152
Ravindra Dhangekar : पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन भोवले; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल
Ravindra Dhangekar : पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन भोवले; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

रवींद्र धंगेकर यांनी पुण्याच्या सहकारनगर परिसरात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी सायंकाळी सहकारनगर पोलीस ठाण्यापुढे आपल्या सहकाऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन केले होते.

या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 143, 147, 149 अंतर्गत तथा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 व लोकप्रतिनिधी अधिनियमचे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

(हेही वाचा – शरद पवार २०१७मध्ये भाजपासोबत सरकार स्थापन करणार होते; पण…; Sunil Tatkare यांनी अनेक गुपिते फोडली)

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन करणारे काँग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर व त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या आंदोलनामुळे पुण्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी धंगेकर यांना विनंती करून जमिनीवर न बसता केबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसावे, तसेच आपली लेखी तक्रार आमच्याकडे द्यावी, त्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू, अशी विनंती पोलिसांनी या वेळी धंगेकर यांना केली.

चुकीची कारवाई करता येणार नाही – पोलीस

विशेषतः या प्रकरणी त्यांना पुरावे सादर करण्याचीही विनंती करण्यात आली. धंगेकर यांनी आपल्या आरोपाप्रकरणी तक्रारही दिली नाही किंवा पुरावेही दिले नाही. रवींद्र धंगेकरांनी केवळ पैसे वाटल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील काही जणांवर अटकेची कारवाई करण्याची तोंडी मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही धंगेकरांना (Ravindra Dhangekar) विनंती केली. तसेच अशा प्रकारे चुकीची कारवाई करता येणार नाही असे त्यांना समाजवून सांगितले. पण धंगेकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यातच भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊनधंगेकरांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी तसे निवेदनही सादर केले. याबाबत पोलिसांनी सहकारनगर (Pune) पोलिस स्टेशन येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.