Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम ; शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम ; शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

66
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम ; शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम ; शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला राजीनामा दिलेला आहे. धंगेकर यांनी आज (10 मार्च) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. (Ravindra Dhangekar)

हेही वाचा-Champions Trophy Final : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धांमध्ये दबदबा; शेवटच्या ३ स्पर्धांमध्ये २३ विजय आणि १ पराभव

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी म्हटले. रविंद्र धंगेकर म्हणाले, माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही. सत्तेत असल्याशिवाय कामं होतं नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेले नाही. काँग्रेस सोडताना मला दु:ख होत आहे, असं धंगेकर म्हणाले. (Ravindra Dhangekar)

हेही वाचा-Budget Session 2025 : सत्ताधाऱ्यांचे मिशन; ‘टार्गेट आदित्य’

रविंद्र धंगेकर आज मुंबईत सायंकाळी एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे धंगेकर यांनी सांगितलं आहे. (Ravindra Dhangekar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.