गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघांत गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि आपमध्ये मुख्य लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने या टप्प्यात 89 जागांवर तर आपने 88 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर मतदारसंघात भाजपकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरली आहे. मतदानापूर्वी, जडेजाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने या पोस्टद्वारे गुजरातींना सल्लाही दिला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
जडेजाने ट्वीटरवर पोस्ट केलेला व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या कार्यक्रमातील आहे. माझं हेच म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तु्म्ही बाजूला केलंत तर तुमचं गुजरात गेलं. हेच मी अडवाणींजवळ बोललेलो आहे, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. यासोबतच गुजराती लोकांना अजूनही वेळ आहे, समजून घ्या, असं कॅप्शनदेखील जडेजाने दिले आहे. रिवाबा जडेजाने 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2017 साली जामनगरमधून निवडून आलेले भाजपच्या धर्मेंद्र सिंग जडेजा यांना पक्षाने तिकीट नाकारत रिवाबा यांना संधी दिली आहे.
Abhi bhi time hai samaj jao gujaratiyo🙏🏻 #respect #balasahebthackeray pic.twitter.com/bwjO3Jj7iq
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 30, 2022
( हेही वाचा: नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधील जितेंद्र आव्हाड; अतुल भातखळकरांचा टोला )
घरातूनच विरोध
रवींद्र जडेजाची बहिण नयनाबा काॅंग्रेसच्या उमेदवार आहेत. जडेजाचे वडीलही काॅंग्रेसचा प्रचार करत आहेत. निवडणुकीपूर्वीच रिवाबा यांनी आपल्या कुटुंबात कोणतेही मतभेद नसून केवळ विचारधारेचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले होते. रवींद्र जडेजाचे वडील काॅंग्रेससाठी मते मागत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp Community