शिवसेना खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीच्या (Jogeshwari) एसआरपीएफ कॅम्पच्या (SRPF Camp) प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीत होते.(Ravindra Waikar)
( हेही वाचा : Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे अंतर होणार कमी; मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत होणार बचत)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या गाडीचा रविवारी मध्यरात्री अपघात झाला आहे.हा अपघात पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ झाला आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या (SRPF Camp) प्रवेशद्वाराजवळ ही दुर्घटना घडली आहे. आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाली. यावेळी खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे गाडीत होते असेही समजते. दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी केली जात आहे.अपघातात कोणी जखमी झाले किंवा काही जीवितहानी झाली आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Ravindra Waikar)
रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी एप्रिल २०२४ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.वायकर १९९२ पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. २००६ पासून त्यांनी बीएमसीच्या स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं.२००९ मध्ये रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी विधानसभेत एन्ट्री केली. सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपद मिळाले. त्यांनी रत्नागिरीचे पालकमंत्रिपदही सांभाळले आहे. (Ravindra Waikar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community