एक हजार पोलीस, २० उमेदवारांचे प्रतिनिधी आणि २० च्या २० उमेदवार मतमोजणी केंद्रामध्ये होते. मग रवींद्र वायकर आतमध्ये जाऊन काहीतरी वेगळं कसं करू शकतो? हे कसं शक्य आहे, हे मला कळत नाही. हे काय चाललंय ? फक्त रडीचा डाव चालला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांचं ट्विट आणि हे सर्व सुरु आहे. या रडीच्या डावाला मी महत्त्व देत नाही. त्यांना जे काय करायचं ते करू द्या. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने ही निवडणूक घेतली. ती योग्य पद्धतीने घेतलेली आहे. कोणी कोणाचा नातेवाईक आहे, म्हणून त्याने ते ईव्हीएम हॅक केलं, असं EVM मशीन हॅक करता येत का? हे जे काय चाललं आहे, हा रडीचा डाव आहे. त्यामुळे मला यावर उत्तर द्यावसं वाटत नाही, तरीही मी यावर स्पष्टीकरण दिलं आहे, असा पलटवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबईतील शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा मेहुणा मंगेश पंडीलकरने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी गेले २ दिवस राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मंगेश पंडीलकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाचा कर्मचारी दिनेश गुरव याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश पंडीलकर हे मतमोजणीच्या खोलीत मोबाईल वापरत असल्याची तक्रार इतर उमेदवारांनी केली होते. त्यानंतर पोलिसांनी ४ जून रोजीच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला होता. आता पोलीस तपासात पंडीलकर हे ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई पोलिसांची तीन पथके तयार
नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी हा मोबाईल वापरला गेल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. हे फुटेज पोलीस आता तपासणार आहेत. या फोनमधील नंबरचा सीडीआरही तपासला जात आहे.
Once a traitor, always a traitor!
The case of the mindhe gang candidate from North West Mumbai gets murkier, as the gaddar candidate indulges in treachery with democracy now.
Surprisingly, or not, the Entirely Compromised- election commission, has refused to share CCTV footage… pic.twitter.com/hT27Bb2qDQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 16, 2024
उबाठा गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोप करतांना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा निवडणुकीतील काहीतरी गोंधळ झाला आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ते द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना जर पदाची शपथ दिली, तर लोकशाहीचा खून झाला आहे, असं समजून काम करावं लागेल, अशा लोकांना शपथ कशी देऊ शकता?”, असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community